ठाणे

आम्ही तिघे एकत्रच आहोत - रवींद्र चव्हाण; डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीकांत शिंदे व मनसे आमदार राजू पाटील एकाच व्यासपीठावर

काही वेळेस वरिष्ठ मंडळींची जी भावना असते ती भावना स्पष्ट करता येत नसते...

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवलीजवळील भोपरगाव-देसलेपाडा मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मंत्री चव्हाण यांनी आम्ही तिघे एकत्र असून स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण अनेक वर्षे विकासाचा अजेंडा घेऊन चालत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले, काही वेळेस वरिष्ठ मंडळींची जी भावना असते ती भावना स्पष्ट करता येत नसते, कल्याण लोकसभेमधील असलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. युती यासंदर्भातले निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात. परंतु स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून विकासाचा अजेंडा घेऊन चालत आहोत. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत, हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे. या उजव्या विचारसरणीच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे पुन्हा हॅट‌्ट्रिक करतील.

नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आलेल्या १४ गावांमधील दहिसर मोरी येथे रस्ते काँक्रीटीकरणासाठी १४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे डोंबिवलीजवळील भोपाळ ते कोपर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी देखील २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातून शंकेश्वर नगर ते भोपरगाव-देसलेपाडा या मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १५ करोड मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामासाठी माजी नगसेविका रवीना अमर माळी, संदीप माळी, सचिन म्हात्रे व संजय देसले यांनी केला आहे.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून