ठाणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी २२ दिवसांपासून आंदोलन; बांधकाम नगरपंचायत विभागाची नकारघंटा कायम

तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत इतर जमिनीची मागणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी करण्यात येणार

Swapnil S

शहापूर : शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या व रमाबाई ब्रिगेडच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड व त्यांचे पती सत्यकमा गायकवाड यांनी मागील २२ दिवसांपासून घर छोडो आंदोलन सुरू केलेले आहे. त्यांनी आपला संसार घेऊन शहापूर तहसील कार्यालयाच्या मैदानात मांडव टाकला आहे. शहापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, नगरसेविका कामिनी आकाश सावंत यांच्या मध्यस्थीने हे घर छोडो आंदोलन मागे घेण्याबाबत एक बैठक तहसीलदार यांच्या दालनात पार पडली; मात्र त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन २२ दिवसांपासून सुरूच असून, आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत विभाग व पंचायत समितीवर आरोप करित आपला संताप व्यक्त केला. लवकरच यापुढे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

सोमवारी, ५ फेब्रुवारीपासून ज्योती गायकवाड या शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होण्यासाठी गेले ३० वर्षांपासूनच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी घर छोडो आंदोलन करीत आपला संसार तहसील कार्यालय शहापूर येथील मैदानात करीत आहे. त्यांनी स्मारकासाठी मागितलेल्या जागांपैकी काही जागा या नगरपंचायत हद्दीतील असून, त्या खाजगी मालकांच्या असल्याने त्या देण्यास नगरपंचायत प्रशासनाने नकार दिला. तर काही जागा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असून त्यांच्या अधिकाऱ्यांनी शासकीय परिपत्रकाचा दाखला देत सा. बा. विभागाच्या जागेत स्मारकासाठी जागा देण्यास नकार दिल्याने स्मारकाचा प्रश्न अनुत्तरित राहिला. तर पंचायत समिती शहापूर च्या मोकळ्या जागेचा वाद हा न्यायालयात सुरू असल्याने त्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकासाठी जागा देण्यास नकार घंटा दाखवल .

शहापूर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेविका कामिनी आकाश सावंत यांनी पुढाकार घेऊन हे घर छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकूर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ज्योती गायकवाड यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इतर जागा सुचवण्याचे आवाहन बैठकीसाठी आलेल्या आंबेडकर समूहाच्या जनतेला केले मात्र त्यात देखील एकमत न झाल्याने ही बैठक देखील निष्फळ ठरली.

तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत इतर जमिनीची मागणी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी करण्यात येणार असून, त्या मागणीला तरी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे असून, तेथे देखील असहकार्य झाल्यास घर छोडो आंदोलनाबरोबरच आमरण उपोषण सुरू करणार.

- ज्योती गायकवाड, आंदोलनकर्ते

ज्या जागांची मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत, त्याला संबंधित विभागांनी नकार दिलेला असून, त्याबाबत त्यांनी लेखी पत्र आमच्या कार्यालयात दिलेले आहेत. स्मारकासाठी नवीन जागेचा प्रस्ताव जर का आला तर निश्चितच त्याचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे आम्हाला करता येईल.

-कोमल ठाकूर, तहसीलदार, शहापूर

ठाणे, डोंबिवली प्लॅटफॉर्मच्या विस्ताराकरिता आज ब्लॉक; काही गाड्या रद्द करण्यात येणार

Mumbai : हॉटेल ट्रायडेंटला BMC चा दणका; अनधिकृत बांधकाम हटवण्याचे दिले आदेश

विद्यार्थ्याला प्रथमच मिळणार CET ची दोन प्रवेशपत्रे; अस्थायी प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे ठिकाण; परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात

पत्नी ही मोलकरीण नाही, तर अर्धांगिनी; घरकामात पतीचाही समान सहभाग हवा! सुप्रीम कोर्टाने टोचले 'नवरोबां'चे कान

जुगार-सट्टेबाजीची ३०० संकेतस्थळे एकाच वेळी ब्लॉक