शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल; न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन, दिव्यातील नगरसेवक पदावर टांगती तलवार (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane : शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल; न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन, दिव्यातील नगरसेवक पदावर टांगती तलवार

ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात न्यायालयात थेट इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महानगरपालिकेत शिंदेसेना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवा परिसरातून निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात न्यायालयात थेट इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये दिवा परिसरातून विजयी झालेल्या शिंदेसेनेच्या नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमुळे पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. याचिकेत संबंधित नगरसेवकांनी निवडणूक शपथपत्रात कथितरीत्या चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे, याबाबत ॲड. रोहिदास मुंडे यांनी माहिती दिली.

याचिकेनुसार, संबंधित नगरसेवकांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, बांधकामे, आर्थिक व्यवहार तसेच इतर महत्त्वाची माहिती पूर्णपणे जाहीर केली नसल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे आणि मालमत्ता लपविल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांच्या विविध निर्णयांचा दाखला देत, निवडणूक शपथपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे हे गंभीर प्रकरण मानले जाते. मतदारांपासून तथ्य लपविणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा अंतर्गत अपात्रतेस कारणीभूत ठरू शकते, असे ॲड. मुंडे यांनी स्पष्ट केले.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमनुसार उमेदवाराने सत्य आणि संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. खोटी माहिती देणे किंवा तथ्य दडविणे हे मतदारांची दिशाभूल करणारे कृत्य मानले जाते. या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे.

आमच्याविरोधात करण्यात आलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. न्यायालयात आम्ही आमची बाजू ठामपणे मांडू. निवडणुकीत जसा विरोधकांचा पराभव झाला, तसाच पराभव न्यायालयीन लढाईतही होईल.
ॲड. आदेश भगत, नगरसेवक

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल