ठाणे

ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा,कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुरावची मागणी

एमएमआरडीए धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या

वृत्तसंस्था

ठाणे जिल्ह्यातील राज्य शासनाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी एमएमआरडीए धर्तीवर ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा या प्रमुख मागणीसह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिदुराव यांच्यासह प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, प्रदेश सचिव प्रसाद महाजन, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत गोंधळी, प्रदेश चिटणीस प्रविण खरात, व्यापारी सेल शहर सचिव दिनेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सदलगे, रेखा सोनावणे, सुरय्या पटेल, अय्याज मौलवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगर प्राधिकरण धरतीवर (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे कल्याण स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करावे. हे प्राधिकरण झाल्यास जलद विकास करता येईल इंफ्रास्ट्रक्चर सामायिक सुविधा रस्ते, ड्रेनेज, सॉलिडवेस्ट मॅनेजमेंट, घनकचरा, दळणवळण साधन, वाहतुक व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, पार्कींग झोन, पाणी पुरवठा नियोजन आदी बाबींकडे शासनाने लक्ष घालावे.

कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारने माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात तरदुत प्रस्तावित केली होती तरी त्यासाठी लागणारा ८०० कोटी निधीपैकी ४०० कोटींचा निम्मा निधी राज्य सरकारने उचलायचा आहे तो तत्काळ उपलब्ध करावा.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्र कॅबिनेट बैठकीत ८ मोठे निर्णय; ॲनिमेशन-गेमिंग धोरणासह विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा : बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त; मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा

Mumbai : इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा आजपासून सुरू; एक किमीला १५ रुपये भाडे; राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी