छायाचित्र : सोशल मीडिया
ठाणे

Kalyan : सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात विषारी नाग

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. या अनपेक्षित घटनेमुळे कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

Swapnil S

कल्याण : कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. या अनपेक्षित घटनेमुळे कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

नकळत कार्यालयात घुसलेल्या या विषारी नागामुळे कर्मचारी भयभीत झाले. विशेषतः एका कक्षात काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ दरवाजा बंद करून स्वतःला सुरक्षित ठेवत तब्बल अर्धा तास खोलीतच कोंडून घेतले. काही वेळानंतर हा नाग ACP यांच्या मुख्य कक्षाच्या दिशेने सरकत असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी खोलीबाहेर पडत सुरक्षित स्थळी धाव घेतली. सुदैवाने घटनेच्या वेळी ACP कार्यालयात उपस्थित नव्हते.

कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयात साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत दक्षतेने या अतिविषारी नागाचा रेस्क्यू केला. सर्पमित्रांच्या मते, २० वर्षांच्या अनुभवात इतक्या गजबजलेल्या कार्यालयात असा मोठा व विषारी नाग आढळणे अत्यंत दुर्मिळ आहे. हा नाग कार्यालयात नेमका कसा शिरला, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. स्टेशनलगतच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र सर्पमित्रांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण