कल्याणमध्ये इमारत पत्त्यांसारखी कोसळली 
ठाणे

कल्याणमध्ये इमारत पत्त्यांसारखी कोसळली, Video

कल्याणमध्ये एक इमारत अक्षरश: पत्त्यांसारखी कोसळली आहे. इमारतीचा कोसळलेला काही भाग हा थेट रस्त्यावर पडला.अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी ही भलीमोठी इमारत कोसळली आहे.

Swapnil S

ठाणे : कल्याणमध्ये एक इमारत अक्षरश: पत्त्यांसारखी कोसळली आहे. इमारतीचा कोसळलेला काही भाग हा थेट रस्त्यावर पडला.अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी ही भलीमोठी इमारत कोसळली आहे.सुदैवाने या इमारत दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही इमारत रि-डेव्हलोपमेंटला गेली होती. टप्प्याटप्प्याने तिचे पाडकाम केले जात होते. पण दुपारच्या सुमारास ही इमारत अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.

या इमारतीत कुणीही वास्तव्यास नव्हते. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. पण या इमारतीचा मलबा थेट रस्त्यावर आला. यावेळी रस्त्याने जाणारी कुठली गाडी नसल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही. घटना घडली तेव्हा बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी जीव मुठीत घेत घरातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी थेट खिडकीतून घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यात त्यांना यश आले. त्यामुळे ते या घटनेत बचावल्याची चर्चा आहे. या भयावह घटनेत कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असते? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरात ही घटना घडली. संबंधित घटना ही दुपारी २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. रि-डेव्हलपमेंटसाठी पाडकाम सुरू असलेल्या विनायक दर्शन इमारतीचा मोठा भाग अचानक भर रस्त्यात कोसळला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेवर आता कल्याणमधील लोकप्रतिनिधींकडून काही प्रतिक्रिया येते का? तसेच या प्रकरणी कुणावर कारवाई केले जाते का? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तसेच या इमारतीत दुर्घटना घडली तेव्हा खरंच कुणीही नव्हते का? याचीदेखील खातरजमा करणे आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दोन मिनिटांत गाड्या फुल्ल! गणपतीसाठी कोकण रेल्वेची तिकिटे 'रिग्रेट'; भाविक चिंतेत, अतिरिक्त गाड्यांची मागणी

व्यापारी जहाजावर हल्ला; ओमानजवळ १० भारतीय बचावले, १ बेपत्ता; भारताकडून तीव्र निषेध

Mumbai : 'बेस्ट'ला उतरती कळा; प्रवाशांची संख्या, उत्पन्नात १० वर्षांत झाली घट; बसेसचा ताफाही ४ हजारांवरून २७८७ वर

व्हिएतनाम बोट दुर्घटनेप्रकरणी कॅप्टनला अटक

देवकुंड धबधब्यात दोन जण बुडाले; पुण्याहून रायगड फिरण्यासाठी आले होते १७ पर्यटक, बचाव कार्य सुरू