शंकर जाधव/डोंबिवली
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत मंगळवारी कल्याण पश्चिम येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडली.
केडीएमसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १२२ नगरसेवक निवडून देण्यात येणार आहेत. निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून, एकूण ३१ प्रभागांपैकी २ प्रभागांमध्ये ३ जागा, तर २९ प्रभागांमध्ये ४ जागा असतील.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी भूषवले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सहाय्यक संचालक नगररचना तसेच महापालिका सचिव किशोर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रवर्गनिहाय जागांचे वितरण
अनुसूचित जाती : १२ जागा
अनुसूचित जमाती : ३ जागा
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग : ३२ जागा
सर्वसाधारण : ७५ जागा
एकूण ६१ महिला आरक्षणाच्या जागांमध्ये पुढील प्रवर्गांचा समावेश
अनुसूचित जाती (महिला) : ६ जागा
अनुसूचित जमाती (महिला) : २ जागा
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) : १६ जागा
सर्वसाधारण (महिला) : ३७ जागा