ठाणे

Kalyan : ''तुम्ही जरा थांबा'' बोलल्याने परप्रांतिय तरुणाकडून मराठी मुलीला बेदम मारहाण; शिवगाळ करत विनयभंग| Video

कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय नशेखोर तरुणाने बेदम मारहाण केल्याचा आणि विनयभंग केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. केवळ "तुम्ही जरा थांबा" एवढं सांगितल्यामुळे आरोपीने तिला पोटात लाथ मारली, केस ओढून फरपटत नेलं आणि तिचा विनयभंग केला.

नेहा जाधव - तांबे

कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय नशेखोर तरुणाने बेदम मारहाण केल्याचा आणि विनयभंग केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. केवळ "तुम्ही जरा थांबा" एवढं सांगितल्यामुळे आरोपीने तिला पोटात लाथ मारली, केस ओढून फरपटत नेलं आणि तिचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आरोपीचे नाव गोपाल झा असे आहे. तर, पीडित तरुणीचे नाव सोनाली प्रदीप कळासारे असून ती कल्याण पूर्वेतील श्री बाल चिकित्सालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.

नेमकं काय घडलं?

सोमवारी (२१ जुलै) सायंकाळी ६.४५ दरम्यान ही घटना घडली. सोनाली नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी करत होती. डॉक्टरांच्या केबिनमध्ये MR बसले होते. यासाठी तिने काही पेशंटला थोडा वेळ थांबण्यास सांगितले.

व्हिडिओमध्ये दिसतंय, की ती एका व्यक्तीला ''तुम्ही जरा थांबा'' म्हणत आहे. तितक्यात बेधुंद नशेत असलेला गोपाळ झा रागात येतो आणि सोनालीच्या पोटात जोरात लाथ मारतोय. सोनाली पाठी असलेल्या टेबलवर आपटते. तो इतक्यावरच थांबत नाहीये तर तिचे केस धरून तिला जमिनीवर आपटतोय. शिवीगाळ करत, कपडे फाडत तिचा विनयभंगही करताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय.

या अमानुष मारहाणीने सोनालीला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला असून, तिला पायावर उभंही राहता येईना अशी अवस्था झाली.

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपी अजूनही फरार आहे. व्हिडिओतील दृश्य पाहून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

२४ तास उलटूनही अटक नाही

मनसेने या प्रकरणी मंगळवारी (२२ जुलै) मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिली. मनसेचे पदाधिकारी अरुण जांभळे आणि इतर अनेक मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली की, रुग्णालयातील तरुणीला मारहाण करणाऱ्या त्या तरुणाला अजून अटक का करण्यात आलेली नाही? यावेळी पत्रकारांशी बोलताना अरुण जांभळे म्हणाले, “या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत, तरीही त्या गुन्हेगाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मनसैनिकही त्या तरुणाचा शोध घेत आहेत. तो मिळाल्यास त्याला आम्ही स्वतः पोलिसांच्या ताब्यात देऊ.”

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार