Kasara Local Train Block : कसारा-इगतपुरी भागात सहा दिवसांचा ब्लॉक संग्रहित छायाचित्र
ठाणे

Kasara Local Train Block : कसारा-इगतपुरी भागात सहा दिवसांचा ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील कसारा-इगतपुरी विभागात पायाभूत कामे करण्यासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा-इगतपुरी विभागात पायाभूत कामे करण्यासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे आसनगाव ते कसारा दरम्यान १७ ते २२ मे रोजी दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० या वेळेत लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कसारा-इगतपुरी विभागात ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संबंधी इनफ्रिंजमेंट हटविण्याच्या पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे इगतपुरी-कसारा अप, डाऊन मुख्य मार्गिका आणि मध्यम मार्गिकेवर १७ मे रोजी ब्लॉक राहणार असून, १८ मे ते २२ मे दरम्यान अप, डाऊन मुख्य मार्गिका, मध्यम मार्गिका तसेच यार्ड मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लॉकमुळे रविवारी काही मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. १७ ते २२ मे या ब्लॉक कालावधीत आसनगाव ते कसारा लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे, तर काही कसारा-सीएसएमटी लोकल आसनगाव येथेच अंशतः रद्द करण्यात येतील. कसारा येथून सुटणाऱ्या काही लोकल आसनगाव येथूनच सुरू करण्यात येणार आहेत. सीएसएमटी-कसारा लोकलपैकी दुपारी १.१०, दुपारी २.१७, दुपारी २.४६ या लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येणार आहेत. तर कसारा-सीएसएमटी दुपारी ३.३५, दुपारी ४.४६, सायंकाळी ५.०२ या लोकल आसनगाव येथून त्याच्या निश्चित वेळेनुसार सुटतील.

ब्लॉकपूर्वी कसाऱ्याकडे जाणारी शेवटची लोकल ही दुपारी १२.३० वाजता सीएसएमटीहून सुटेल. तर, सीएसएमटीकडे येणारी शेवटची लोकल ही दुपारी २.४२ वाजता कसाऱ्यातून रवाना होईल. ब्लॉकनंतर कसाऱ्याकडे जाणारी पहिली लोकल दुपारी ४.५० वाजता सीएसएमटीहून सुटेल, तर सीएसएमटीकडे येणारी पहिली लोकल सायंकाळी ६.१७ वाजता कसाऱ्यातून सुटेल.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video