कसारा मार्गावर १५ तासांचा ब्लॉक; आज आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल राहणार बंद 
ठाणे

कसारा मार्गावर १५ तासांचा ब्लॉक; आज आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल राहणार बंद

कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामासाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक मध्य रेल्वेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : कल्याण ते कसारा स्थानकांदरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेच्या कामाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी आवश्यक असलेल्या ‘नॉन-इंटर लॉकिंग’ कामासाठी उंबरमाळी आणि आटगाव स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक मध्य रेल्वेने घेतला आहे. २५ एप्रिल रोजी दुपारपासून सुमारे १५ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध असणार नाहीत.

आज दुपारी १२ वाजेपासून मध्यरात्री ३ वाजेपर्यंत उंबरमाळी ते आटगाव दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकेवर ब्लॉक असेल. त्यामुळे कसाराच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरीय गाड्या आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकांवरच थांबवल्या जातील. तसेच याच स्थानकातून गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

शनिवारी कसारा येथून दुपारी २.४२ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल रद्द केली आहे, तर काही गाड्यांचे अर्धवट प्रवास समाप्त होणार आहेत. सीएसएमटी येथून सकाळी ९.३४ ते रात्री ९.३२ या वेळेत सुटणाऱ्या सीएसएमटी-कसारा लोकल गाड्या आसनगाव येथेच थांबवल्या जातील, तर सीएसएमटी येथून दुपारी १.३० वाजता सुटणारी सीएसएमटी-आसनगाव लोकल, सायंकाळी ६.२८ वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल, तसेच शनिवारी रात्री सीएसएमटी येथून १२.०८ वाजता सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल या गाड्या टिटवाळा येथेच थांबवल्या जातील. तर शनिवारी रात्री १०.४७ वाजता सीएसएमटी वरून सुटणारी सीएसएमटी-कसारा लोकल वासिंद येथेच थांबवली जाईल.

शेवटच्या आणि पहिल्या लोकल गाड्या

  • ब्लॉकपूर्वी सीएसएमटीवरून कसारा दिशेकडे जाणारी शेवटची लोकल, शनिवारी सकाळी ८.३३ वाजता लोकल असेल.

  • ब्लॉकपूर्वी कसारावरून सीएसएमटी दिशेकडे जाणारी शेवटची लोकल शनिवारी सकाळी १०.१८ वाजताची कसारा-सीएसएमटी लोकल असेल.

  • ब्लॉक संपल्यानंतर सीएसएमटी-कसारा लोकल, रविवारी पहाटे ४.१९ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.

  • ब्लॉक संपल्यानंतर कसारावरून सीएसएमटी दिशेकडे जाणारी पहिली लोकल रविवारी पहाटे ३.५१ वाजता कसारावरून सुटणारी कसारा-सीएसएमटी लोकल असेल.

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाही कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

इंडोनेशियात ६.७ तीव्रतेचा भूकंप; इमारतींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, Video

Mumbai : खड्ड्यांची तक्रार आता एका क्लिकवर; नागरिकांसाठी BMC ची नवी सुविधा