ठाणे

KDMC महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव; शिंदेसेनेच्या किरण भांगळे व हर्षदा थवील प्रमुख दावेदार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आगामी महापौरपदासाठी गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, आता ही लढत मर्यादित उमेदवारांमध्येच रंगणार आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) आगामी महापौरपदासाठी गुरुवारी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, आता ही लढत मर्यादित उमेदवारांमध्येच रंगणार आहे.

आरक्षण जाहीर होताच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मधील केवळ दोन नगरसेवक या पदासाठी पात्र ठरले असून, किरण राजाराम भांगळे आणि हर्षदा थवील ही दोन नावे महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. पक्षातील सूत्रांनुसार, पुढील महापौर यांच्यापैकीच एक असण्याची दाट शक्यता आहे.

हर्षदा थवील या पॅनल क्रमांक ३ (ब) मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या असून, आरक्षण जाहीर होताच त्यांनी महापौरपदासाठी आपली तयारी सुरू केली आहे.

दुसरीकडे, प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेले किरण राजाराम भांगळे हे शिवसेना (शिंदे गट) मधील सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जातात.

केडीएमसीमध्ये शिवसेना (शिंदे गट) हा ५३ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजपकडे ५० नगरसेवक आहेत. शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या मनसेच्या नगरसेविका शीतल मांधारी यांचेही नाव चर्चेत असले, तरी मुख्य लढत भांगळे व थवील यांच्यातच असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून संकेत मिळत आहेत.

आरक्षणामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या आशा मावळल्या

अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या महापौरपदाच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. शिवसेना (शिंदे गट) तसेच भाजपमधील अनेक दिग्गज या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता लक्ष स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकडे वळले असून, या पदासाठी ज्येष्ठ नेत्यांमध्ये जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. शिंदे गटाचे पारडे जड असल्याने, पक्ष नेतृत्वाचा निर्णय आगामी काळातील महापालिकेची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

NEET Paper Leak : सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश NTA ची पाहणी करणार

राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटी

१०६ पदकांचा विक्रम मोडण्याचे यंदा आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून शानदार प्रारंभ, भारताचे तब्बल ४९६ खेळाडूंचे पथक होणार सहभागी

मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद