खारेगावमध्ये विचित्र अपघातात महिला ठार; दोघे जण गंभीर जखमी 
ठाणे

खारेगावमध्ये विचित्र अपघातात महिला ठार; दोघे जण गंभीर जखमी

कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे एका भरधाव कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Swapnil S

ठाणे : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे एका भरधाव कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या खारेगाव येथील स्थानिक रहिवासी होत्या. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खारेगाव येथील गजबजलेल्या परिसरातून जात असताना एका चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कारने परिसरातील अनेक वाहनांना एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जवळून जाणारे पादचारी आणि नागरिक या अपघाताच्या कचाट्यात सापडले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य दोन व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचा अतिवेग, वाहनातील तांत्रिक बिघाड की चालकाचा निष्काळजीपणा, यांपैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याचा अधिक तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक

Navi Mumbai : खारघर हाफ मॅरेथॉनमुळे उद्या वाहतुकीत बदल; पहाटे ५ वाजल्यापासून 'या' मार्गांवर निर्बंध, वाहतूक पोलिसांकडून सूचना

मुंबईत ATS ची मोठी कारवाई! माहीममधून तरुणाला अटक; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

Philippines Plane Crash : प्रशिक्षणादरम्यान हवाई दलाच्या दोन विमानांची धडक; चार वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू, Video

Video : हॉस्टेलमध्ये 'अँटी-सुसाइड' पंखे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुरतमधील विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय