ठाणे

उल्हासनगर आयुक्तपदी मनीषा आव्हाळे; पहिली महिला आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती!

संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे.

Swapnil S

उल्हासनगर : संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कामकाजाला नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. त्यानंतर आयुक्तपदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर यांची नावे प्रबल दावेदार होती. मात्र, अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली. उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

प्रेरणादायी प्रवास

मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते. स्वतः उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडले, मात्र मुलगी कलेक्टर व्हावी, असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. २०१८ मध्ये त्यांनी ३३ वी रॅंक मिळवत देशभरात लौकिक मिळवला. या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणेला दिले. यूपीएससीच्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वडील गंभीर आजारी पडले, तर आईला कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला.

मनीषा आव्हाळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले.

आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

Ahmedabad Plane Crash : ''माफी मागा, नाहीतर..'' पायलट असोसिएशनची WSJ आणि Reuters ला कायदेशीर नोटीस

विठ्ठलाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी; चंद्रभागेत तीन महिला भाविक बुडाल्या, दोघींचा मृत्यू, एक बेपत्ता

तृणमूल सरकार गेल्यानंतरच बंगालचा विकास होईल; पंतप्रधानांची गर्जना

आमदार माजलेत, ही जनभावना! मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना कानपिचक्या