ठाणे

डहाणूतील भाताच्या गोदामाला भीषण आग

डहाणू तालुक्यातील घोल येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ लिमिटेडच्या भात खरेदी केंद्रात मंखळवारी पहाटे भीषण आग लागली.

Swapnil S

पालघर : डहाणू तालुक्यातील घोल येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ लिमिटेडच्या भात खरेदी केंद्रात मंखळवारी पहाटे भीषण आग लागली. या गोदामात सुमारे ३२४० क्विंटल भाताचा साठा करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच अदानी डहाणू थर्मल अग्निशमन दलाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मंगळवारी आग आटोक्यात आणण्यात अदानी डहाणू थर्मल अग्निशमन केंद्राला यश आल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. तातडीने तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. या कठीण परिस्थितीतही अदानी डहाणू थर्मल अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात आणि मोठे नुकसान टाळण्यात यश आले. स्थानिक प्रशासनाने अग्निशमन दलाच्या परिश्रमांचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे. सदर घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिक तपास सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गोदामांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video