आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश  
ठाणे

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

कल्याण लोकसभा मतदारसंघाला मुंबई आणि नवी मुंबईशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग क्रमांक १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.

शंकर जाधव

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाला मुंबई आणि नवी मुंबईशी अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग क्रमांक १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या ऐतिहासिक प्रकल्पाचा समावेश केला आहे.

कल्याण-डोंबिवली शहराला तळोजा मार्गे थेट नवी मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ या मार्गाचे ‘मेट्रो १२ अ’ अंतर्गत विस्तारीकरण करण्यात येणार असून कल्याण-शिळफाटा रस्त्याला समांतर मेट्रो मार्गिका उभारली जाणार आहे. कल्याण फाट्यावरून ही मेट्रो दहिसार मोरी मार्गे तळोजा मेट्रो स्थानकापर्यंत धावणार असून यामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ८ हजार ४१४.५३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक व्यवस्थेत गेल्या काही वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली असून मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल तसेच रस्ते रुंदीकरणाचे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. खासदार डॉ. शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली असून एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मेट्रो १२ अ ची स्थानके

या मार्गावर एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहेत. प्रमुख स्थानके पुढीलप्रमाणे मानपाडा, कटाई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण आणि खुतारी गाव.

कशी असेल मेट्रो १२ अ मार्गिका?

ही विस्तारित मेट्रो मार्गिका कल्याण-मानपाडा-कटाई नाका-कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो १२ शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक (अमनदूत) पर्यंत पोहोचेल. कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान प्रस्तावित कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गासोबत कॉमन ट्रॅक आणि स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे. निलजे डेपो कनेक्शन, प्रस्तावित मेट्रो १४ इंटिग्रेशन तसेच ठाणे-बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणीही या मार्गाद्वारे करण्यात येणार आहे. सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर असून त्यापैकी सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतिपथावर आहे.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती