ठाणे

मुंब्य्रात स्लॅब कोसळून चिमुरडीचा मृत्यू; ३ जण किरकोळ जखमी, इमारत सील

मुंब्य्राच्या जीवनबाग येथील बानू टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळून घरात असलेली ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले.

Swapnil S

ठाणे : मुंब्य्राच्या जीवनबाग येथील बानू टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळून घरात असलेली ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी आपत्ती विभागाने धाव घेत ही इमारत रिकामी करून सील केली आहे.

रविवारी सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास मुंब्य्रातील जीवनबाग परिसरातील बानु टॉवर बी विंगमधील या ५ मजली जुनी इमारतीच्या तळमजल्याचा स्लॅब कोसळला. त्यावेळी घरात असलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला तर घरातील इतर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मयत मुलीचे नाव उनेजा शेख असून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका व ६ गाळे असून इमारत सी २ बी प्रवर्गात येत असून इमारतीमधील संबंधित रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस