मुंब्रा : बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार 
ठाणे

मुंब्रा : बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार

मुंब्रा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि यूट्युबर नदीम खान उर्फ बाबा खान यांच्या घरावर आणि वाहनावर शनिवारी पहाटे एका टोळीने गोळीबार केला. आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरही हल्लेखोराने दोन पिस्तुलांमधून बेछूट गोळीबार केला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला फिल्मीस्टाईलमध्ये अटक केली.

Swapnil S

ठाणे : मुंब्रा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि यूट्युबर नदीम खान उर्फ बाबा खान यांच्या घरावर आणि वाहनावर शनिवारी पहाटे एका टोळीने गोळीबार केला. आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरही हल्लेखोराने दोन पिस्तुलांमधून बेछूट गोळीबार केला. मात्र, मुंब्रा पोलिसांनी सराईत गुन्हेगार शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) याला फिल्मीस्टाईलमध्ये अटक केली. या धुमश्चक्रीत दोन स्थानिक हाऊसिंग नागरिक गोळी लागून जखमी झाले आहेत.

कौसा येथील अरमान को- ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहणाऱ्या नदीम खान यांच्या घराबाहेर शनिवारी पहाटे गोळीबाराचा आवाज झाला. हल्लेखोरांनी खान यांच्या कारवर दोन आणि हवेत एक अशा एकूण तीन गोळ्या झाडल्या. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले असता, त्याने दोन्ही हातात पिस्तूल घेऊन पोलिसांच्या दिशेने सिनेस्टाइल गोळीबार करण्यास सुरुवात केली.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल