ठाणे

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार

Swapnil S

वाडा : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर मोठया प्रमाणात अन्याय होत आहे. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असलेल्या सरकारबाबत विधानपरिषद सभागृहात आवाज उठविणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा व इतर प्रकल्पामध्ये भूसंपादन झालेल्या शेतकरी आदिवासी व इतर नागरिकांना जमिनीचा योग्य तो बदला मिळाला नसल्याच्या मोठ्या तक्रारी या दरबारामध्ये दानवे यांच्यासमोर आल्या. पालघर जिल्ह्यात आयोजित जनाधिकार जनता दरबाराला शनिवारी नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पालघर जिल्ह्यातील बुलेट प्रकल्प, वाढवण, मुंबई वडोदरा, प्रदूषण, एमआयडीसी, मच्छिमार आदिवासी भूसंपादन पुनर्वसन अशा अनेक तक्रारींचा पाऊस पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील नागरिकांनी जनाधिकार बैठकीत वाचला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी पालघर शहरातील काँग्रेस भवन सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा दानवे यांच्यासमोर वाचला. या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, असे आश्वासन अंबादास दानवे यांनी तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना दिले. या दरबारामध्ये जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनाधिकार जनता दरबारात २६९ अर्ज प्राप्त झाले. यात ११९ अर्जदारांना पाठपुराव्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पत्र देण्यात आले. तर ४३ प्रकरण ऑन द स्पॉट निकाली काढण्यात आले. तर उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे दानवे यांनी म्हटले.

ग्रामपंचायतमधील मूलभूत प्रश्न नागरिकांनी दानवे यांच्यासमोर मांडला. मोखाडा, जव्हार भागातील स्थलांतर कुपोषण अशा विषयावरही साधक बाधक चर्चा दानवे यांनी केली. नागरिकांच्या समस्या कागदावरती न ठेवता त्या प्रत्यक्षात सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू फक्त जनता दरबार भरवण्याचा व देखावा करण्याचा आमचा मानस नसून जनतेचे प्रश्न हिरिरीने सोडवण्याचा आमचा मूळ उद्देश आम्ही साध्य करणार आहोत, असे दानवे यांनी सभेच्या शेवटी सांगितले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त