उल्हासनगरात गोळीबाराचा थरार; जुन्या वादातून अंदाधुंद फायरिंग, २ ठार 
ठाणे

उल्हासनगरात गोळीबाराचा थरार; जुन्या वादातून अंदाधुंद फायरिंग, २ ठार

उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराच्या थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराच्या थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कैलास कॉलनी चौकात जुन्या वादातून झालेल्या या अंदाधुंद फायरिंगमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर अक्षरशः दहशतीखाली गेला होता.

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील कैलास कॉलनी चौकात रात्री उशिरा जुन्या वैमनस्यातून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. काही अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करत तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्यासह हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा