महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर, राज्यात न थांबण्याची अट 
ठाणे

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेंना जामीन मंजूर, राज्यात न थांबण्याची अट

ठाणे जिल्ह्यातील पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला.

Swapnil S

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. तसेच, या प्रकरणाचा खटला जलदगतीने आणि विशिष्ट मुदतीत चालवून पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या महिन्यात या कथित मारहाण प्रकरणातील अन्य चार आरोपींनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखाड यांच्या खंडपीठाने म्हात्रे आणि इतर आरोपींवर कडक अटी लादल्या असून, या प्रकरणात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल होईपर्यंत त्यांना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले की, "एक निवडून आलेला नगरसेवक हा 'जनतेसाठी आणि जनतेद्वारे' असतो असे मानले जाते. जर अशा लोकप्रतिनिधीने आपल्याच मतदारांवर हल्ला केला, तर तो लोकशाहीच्या मूलभूत चौकटीवरच केलेला हल्ला आहे.

तथापि, आता या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे आणि आरोपींनी काही काळ तुरुंगात घालवला आहे ही बाब लक्षात घेता जामीन मंजूर केला जाऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने सर्व आरोपींना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. केवळ जेव्हा ट्रायल कोर्ट या प्रकरणात आरोप निश्चित करेल, तेव्हाच आरोपींना महाराष्ट्रात परतण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतरही ते या प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क साधणार नाहीत किंवा कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

खंडपीठाचे आदेश

खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला या खटल्यासाठी दहा दिवसांच्या आत विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर आणि १२ कार्यदिवसांच्या आत राज्य फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील ५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करावे, असेही आदेशात म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी