ठाणे

घोडबंदर रस्त्याची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेकडे; ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता महापालिकेला हस्तांतरित

मीरा-भाईंदर व ठाणे शहराला जोडणारा ठाणे घोडबंदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडे असताना तो रस्ता आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेची अगोदरच डबघाई असतानाही त्यातच असा निर्णय घेण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना साजरा केल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर व ठाणे शहराला जोडणारा ठाणे घोडबंदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडे असताना तो रस्ता आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेची अगोदरच डबघाई असतानाही त्यातच असा निर्णय घेण्यात आल्याने दुष्काळात तेरावा महिना साजरा केल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत. एक-दोन महिन्यांपूर्वीच काही दिवस रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करत त्याठिकाणी नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते ते आता पूर्णपणे उखडले असून आताची परिस्थिती पूर्वीपेक्षा बेकार झाली असल्याने प्रवासी, नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरसावे येथील फाऊंटन हॉटेल ते गायमुख असा साडेचार किलोमीटरपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. यामुळे भविष्यात या मार्गांवरील वाहतूककोंडीची समस्या दूर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठाण्याच्या घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. याशिवाय या मार्गावरून मुंबई, वसई, विरार, भाईंदर भागातून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या तुलनेत हा रस्ता अरुंद असून अनेक वळण व चढउतार आहेत परिणामी या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या सतत उद्भवत असते. म्हणून फाऊंटन हॉटेल ते गायमुखपर्यंतचा सुमारे ६ किमीचा ३० मीटर इतका असणारा रस्ता ६० मीटर इतका रुंद करण्याची मागणी केली जात होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता आता मीरा-भाईंदर पालिकेला आता हस्तांतरित करण्यात आला आहे.

Sydney Mass Shooting: सिडनीतील बॉन्डी बीचवर भीषण गोळीबार; १० जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेच्या रोड आयलंडमधील ब्राउन विद्यापीठात गोळीबार; २ जणांचा मृत्यू, संशयिताचा शोध सुरू

अजित पवारांनी हेडगेवार स्मृतीस्थळाची भेट टाळली, आनंद परांजपेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीची उद्या घोषणा?