मुंब्य्रात 'कैसा फसाया'ची चर्चा; जात प्रमाणपत्र प्रकरणी सहार शेख अडचणीत 
ठाणे

मुंब्य्रात 'कैसा फसाया'ची चर्चा; जात प्रमाणपत्र प्रकरणी सहार शेख अडचणीत

मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहार शेख यांच्या नगरसेवकपदावर सध्या संकटाचे ढग दाटले असून, एकेकाळी 'कैसा हराया' अशी टीका करणाऱ्या सहार शेख यांच्याच बाबतीत आता 'कैसा फसाया' अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Swapnil S

ठाणे : मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहार शेख यांच्या नगरसेवकपदावर सध्या संकटाचे ढग दाटले असून, एकेकाळी 'कैसा हराया' अशी टीका करणाऱ्या सहार शेख यांच्याच बाबतीत आता 'कैसा फसाया' अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जात प्रमाणपत्राशी संबंधित दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर प्रशासनाकडून गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. यामुळे त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, जात पडताळणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः स्थलांतरित प्रकरणांमध्ये वापरावयाच्या निर्धारित नमुन्याऐवजी अन्य नमुन्याचा वापर करून प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांची दिशाभूल झाल्याची नोंदही अहवालात करण्यात आली आहे.

या संदर्भात ठाणे तहसीलदार कार्यालयात सुनावणी पार पडली. पहिल्या सुनावणीला संबंधित व्यक्ती अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या प्रतिनिधींनी कागदपत्रे सादर केली. मात्र, पुढील सुनावणीत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे स्पष्ट झाले. तसेच रहिवास व प्रमाणपत्र मिळविण्याच्या ठिकाणाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तहसीलदारांनी तयार केलेल्या अहवालात संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली असून, हा अहवाल पुढील निर्णयासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विरोधकांवर 'कैसा हराया' अशी टीका करणाऱ्या सहार शेख यांच्याच अडचणींमुळे आता 'कैसा फसाया' अशा उलट चर्चांना उधाण आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत