जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हे विरोधकांचे षडयंत्र; MIM नगरसेविकेच्या वडिलांचा आरोप 
ठाणे

जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हे विरोधकांचे षडयंत्र; MIM नगरसेविकेच्या वडिलांचा आरोप

जात प्रमाणपत्र सुमारे १५ वर्षांपूर्वी अधिकृत प्रक्रियेद्वारे मिळाले असून ते पूर्णपणे वैध आहे. हे प्रमाणपत्र ठाणे तहसीलदार कार्यालयातूनच देण्यात आले आहे. कुटुंबाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून चुकीचे आरोप लावले जात असल्याचा दावा करत हा वाद विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख यांचे वडील युनुस शेख यांनी केला.

Swapnil S

ठाणे : जात प्रमाणपत्र सुमारे १५ वर्षांपूर्वी अधिकृत प्रक्रियेद्वारे मिळाले असून ते पूर्णपणे वैध आहे. हे प्रमाणपत्र ठाणे तहसीलदार कार्यालयातूनच देण्यात आले आहे. कुटुंबाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून चुकीचे आरोप लावले जात असल्याचा दावा करत जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप एमआयएमच्या नगरसेविका सहार शेख यांचे वडील युनुस शेख यांनी केला. ठाणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत युनूस शेख यांनी मुलगी सहार शेख व त्यांच्यावर जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदे घेत भूमिका मांडली.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंब्र्यात 'एमआयएम'ने जोरदार मुसंडी मारत पाच जागांवर विजय मिळवला. यामध्ये प्रभाग क्र. ३० (ब) मधून सहार शेख निवडणूक आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वाद सुरू होता. शेख यांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याबाबत आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर, शेख यांचे नगरसेवक पद रद्द होणार, अशीही चर्चा सुरू होती. त्यामुळे सोमवारी शेख यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांचे वडील युनूस शेख यांनी कुटुंबामधील प्रत्येकाचे जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्र सादर केली.

सर्व कागदपत्रे वैध

आमची सर्व कागदपत्र वैध असून विरोधकांनी माझ्या मुलीच्या विजयानंतर धसका घेतला आहे. त्यामुळेच हा बनाव सुरू असल्याचे युनूस शेख यांनी सांगितले तसेच तक्रारदाराने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला असला तरी आमच्याकडे सर्व वैध पुरावे आहेत, असे शेख यांनी स्पष्ट केले. शासकीय यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नसताना प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही सुनावणी उपविभागीय आयुक्तांच्या स्तरावर व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत