Thane : शिंदेसेनेच्या बिनविरोध नगरसेविकेचे पद संपुष्टात; जात प्रमाणपत्राच्या तपासणीनंतर कारवाई 
ठाणे

Thane : शिंदेसेनेच्या बिनविरोध नगरसेविकेचे पद संपुष्टात; जात प्रमाणपत्राच्या तपासणीनंतर कारवाई

ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ ‘अ’मधून बिनविरोध निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ ‘अ’मधून बिनविरोध निवडून आलेल्या शिंदेसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे. अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राच्या तपासणीप्रकरणी संबंधित समितीने दिलेल्या आदेशानंतर त्यांचे पद आपोआप संपुष्टात आल्याचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना कळविले आहे. या कारवाईमुळे शिंदेसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ ‘अ’मधून सुलेखा चव्हाण या शिंदेसेनेकडून निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या बिनविरोध निवडून आल्याने या प्रभागातील निकालाची विशेष चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा मुद्दा पुढे आल्यानंतर हे प्रकरण अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीसमोर गेले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात संबंधित समितीच्या आदेशानुसार सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे नगरसेविका पद आपोआप संपुष्टात आल्याचे नमूद केले आहे. समितीच्या आदेशाची प्रत तसेच संबंधित पत्रव्यवहार महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

बिनविरोध विजयावर प्रश्नचिन्ह

बिनविरोध निवडून आल्यानंतर नगरसेविका म्हणून महापालिकेत प्रवेश केलेल्या चव्हाण यांचे पद काही महिन्यांतच संपुष्टात आल्याने शिंदेसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. शिंदेसेनेचे एका नगरसेविकेचे पद अशा प्रकारे संपुष्टात आल्याने टीका करण्याची संधी मिळाली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : भूखंड आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वादावादी; सुधार समितीत भाजप-शिवसेना आमनेसामने, भाजप सदस्यांचा सभात्याग

मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना बंदी; १९ सप्टेंबर सकाळी ८ ते २० सप्टेंबर रात्री ११पर्यंत वाहतूक बंद

Mumbai : मढ-वर्सोवा केबल स्टेड पुलाचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, १,२३७ झाडे तोडण्यास पालिकेला परवानगी

कच्च्या तेलाने शंभरी ओलांडली! जुलैनंतर पहिल्यांदाच डाॅलरचे शतक पार

Navi Mumbai : प्रौढ बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाच्या सक्त निर्देशानंतर ऐतिहासिक पाऊल