ठाणे

फेरीवाल्यांच्या 'या' उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालिका प्रशासनास दुकानदार व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारतात. परंतु प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही

शंकर जाधव

पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका, कागदी किंवा पिशव्यांचा वापरा अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र पर्यावरणाचा विचार न करणारे अनेकजण प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसतात. पालिका प्रशासनास दुकानदार व फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारतात. परंतु प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. अशावेळी डोंबिवलीतील फेरीवाल्यांनी ग्राहकांना भाजी, फळे देताना प्लास्टिक पिशव्या देणार नसल्याचे ठरविले. फेरीवाल्यांच्या या उपक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पालिकेचे फेरीवाला अतिक्रमण हटाव विभागाचे पथक प्रमुख विजय भोईर व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाबाबत फेरिवाल्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे आपल्याप्रमाणे इतर भागातील फेरिवाल्यांनाही या उपक्रमात भाग घ्यावा म्हणून जनजागृती करताना फेरीवाल्यांबरोबर पथक प्रमुख भोईर हेही उपस्थित होते.

डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनपासून १५० मीटरच्या बाहेर फेरीवाले बसतात.येथील पथक प्रमुख भोईर व कर्मचारी यांनी स्टेशनबाहेरील परिसर फेरीवालामुक्त ठेवला आहे. गोमंतक बेकरी पुढील फेरीवाल्यांनी ग्राहकांना प्लास्टिक पिशव्या देणार नाही असे फलक लावले. येथील फेरीवाल्यांनी सम्राट हॉटेल रस्त्यावरील फेरीवाल्यांमध्ये जनजागृती करण्याचे ठरविले. याची माहिती पथकप्रमुख भोईर व कर्मचाऱ्यांना समजताचतेही जनजागृतीत सहभागी झाले. जनजागृतीने येथील फेरीवाल्यांनीसुद्धा अशाप्रकारचे फलक लावले. विशेष म्हणजे भाजी- फळे विकत घेण्यासाठी येणारे नागरिक कापडी पिशव्या घेऊन येताना दिसत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली