ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला हार घातलेला फोटो फेसबुकवर शेअर करून त्यासोबत आक्षेपार्ह कॅप्शन लिहिल्याच्या आरोपावरून राजकपूर यादव नामक व्यक्तीविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र एकनाथ मढवी (४३) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी यादव याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसह संबंधित पोस्ट फेसबुकवर प्रसारित केली. मढवी यांनी पोस्टचा स्क्रीनशॉट तसेच रंगीत प्रिंटआउट पोलिसांकडे सादर केला आहे. पोस्ट कोणी तयार केली, कोणत्या उद्देशाने प्रसारित केली आणि ती किती जणांपर्यंत पोहोचली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.