संग्रहित छायाचित्र 
ठाणे

प्रभागातील लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक ? ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत नवा संदर्भ

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत २०११ च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्या गृहित धरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २० जुलैपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, त्यांना मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे मतदार संख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार असलेल्या नव्या आराखड्यामुळे यंदाची निवडणूक विशेष महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू केली असून, त्यात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ११ जुलै रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची ३५ प्रभागांची संरचना तशीच राहणार आहे.

या निवडणुकीत २०११ च्या जनगणनेवर आधारित लोकसंख्या गृहित धरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २० जुलैपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे, त्यांना मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे मतदार संख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१७ मध्ये ठाणे महापालिकेतील मतदारांची संख्या १२,२८,६०६ होती. यामध्ये सुमारे ६० हजारांची वाढ होऊन सध्याची मतदार संख्या १२,८९,७४८ इतकी झाली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जुलै २०२५ पर्यंत सुमारे दीड लाख नवीन मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्या १४ लाखांहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या ३५ प्रभागांची संरचना नव्याने निश्चित करताना लोकसंख्या आणि मतदारवाढीच्या आधारे सूक्ष्म फेरबदल करण्यात येतील. काही प्रभागांचे सीमारेषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, दिवाळीनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, प्रथम प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल, त्यावर हरकती व सूचना मागवण्यात येतील, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेमुळे राजकीय पक्षांसमोरही नवी रणनीती आखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. नवमतदारांचा कल लक्षात घेऊन प्रचाराची दिशा ठरवावी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रशासनाने मतदार संख्येचा आढावा घेऊन निवडणूक आयोगाकडे सविस्तर आकडेवारी सादर केली आहे. निवडणुकीसंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनंतर जाहीर होईल.

यंदा चार सदस्यीय प्रभाग रचना

वाढलेल्या मतदार संख्येमुळे काही प्रभागांत, विशेषतः नवविकसित घोडबंदर परिसर, दिवा, मुंब्रा आणि शीळफाटा या भागांत लोकसंख्येपेक्षा अधिक मतदारांची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीतील प्रचार, गणितं आणि पक्षांची रणनिती यावर परिणाम होणार आहे. २०१७ मध्ये महापालिकेतील प्रभागांची संख्या ३३ वरून ४२ करण्यात आली होती. त्यावेळी तीन सदस्यीय पॅनल रचना होती आणि सदस्यसंख्या १३१ वरून १४२ वर पोहचली होती. मात्र, यंदा चार सदस्यीय प्रभाग रचना कायम राहणार असल्याने प्रभागसंख्या ३५ असणार आहे. परिणामी, एकूण सदस्यसंख्याही १३१ वर स्थिर राहील.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

गृह मंत्रालयाशी चर्चा करायला लडाखचे शिष्टमंडळ तयार; येत्या बुधवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल