ठाणे

स्तनाच्या कर्करोगाचे निदान आता ठाण्यातच! मुंबईच्या खासगी हॉस्पिटलांत धावपळीची नाही गरज, ठाणे सिव्हिल रुग्णालयात 'ही' मशीन सुरू

स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आजार आहे. पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) नुकतेच...

Swapnil S

ठाणे : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आजार आहे. पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) नुकतेच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही.

या नव्या सुविधा विभागाचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. सचिन घोलप, डॉ. अविनाश पडळकर आदी विविध विभागप्रमुख आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मॅमोग्राफी ही एक खास प्रकारची एक्स-रे तपासणी आहे, जी स्तनांमध्ये होणारे बदल, गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही. सामान्यतः ५० ते ७४ वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात. ४० ते ४९ वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचे अंतर व गरज ठरवावी.

या मॅमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत व कमी खर्चात स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे. पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खासगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावे लागते, जे वेळखाऊ आणि खर्चिक होते. आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सामान्य महिलांनाही तत्काळ व मोफत तपासणीचा लाभ घेता येईल. - डॉ. कैलास पवार, (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे )

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी