एक्स @PratapSarnaik
ठाणे

कोणत्याही वादात पडू नकोस...जितेंद्र आव्हाडांचा परिवहन मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला

कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री असा सरळ मार्ग करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल, असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे.

Swapnil S

ठाणे : कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री असा सरळ मार्ग करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल, असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे. १५ ते १६ वर्षांपूर्वी एकेकाळच खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवलनिमित्त एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांनीही मैत्रीचे संबंध असतानाच्या त्यांच्या जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले आहे. गेल्या ११ वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिले होते. ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती लावली. त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचे भरभरून कौतुक देखील यावेळी केले.

‘गेली ३५ वर्षे मी आणि सरनाईक एकत्र आहोत. कधी लांब गेलो. कधी जवळ आलो. लांब मात्र एकदाच गेलो, पण जवळ मात्र कायम राहिलो. त्याचे कारण म्हणजे आमची माऊली (प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक) आहे. सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत. कष्टाने जेव्हा यश मिळते ना, तेव्हा यशाची किंमत कळते.

मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासून मित्र आहोत. विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले. आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे. भविष्यात ते आजी मंत्री होवोत, अशी अपेक्षा करतो.

प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

सगळ्यांच्या दृष्टीने तू वेगळ्या पद्धतीने चमकावे एवढीच इच्छा व्यक्त करतो, नाहीतर लोक आजकाल चमकतात. भ्रष्टाचार बाहेर येतात. काही जणांच्या ऑर्डरला स्टे ऑर्डर मिळत आहे. त्या वादात तू पडू नकोस, असा मित्रत्वाचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यावेळी दिला.

आमदार जितेंद्र आव्हाड

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video