Thane : वटवृक्षांची संख्या जाहीर करा! पर्यावरण अभ्यासकांची मागणी 
ठाणे

Thane : वटवृक्षांची संख्या जाहीर करा! पर्यावरण अभ्यासकांची मागणी

ठाणे महापालिकेच्या २०२२ च्या वृक्षगणनेनुसार शहरात १,९६४ वटवृक्ष शिल्लक आहेत. त्यानंतर मेट्रो, रिंग रेल्वे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि विविध विकासकामांमुळे किती वटवृक्ष नष्ट झाले, याची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. ठाण्यातील वटवृक्षांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०२२ च्या वृक्षगणनेनुसार शहरात १,९६४ वटवृक्ष शिल्लक आहेत. त्यानंतर मेट्रो, रिंग रेल्वे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि विविध विकासकामांमुळे किती वटवृक्ष नष्ट झाले, याची अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. ठाण्यातील वटवृक्षांची संख्या जाहीर करावी, अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

‘वटपौर्णिमे’च्या निमित्ताने वटपूजनाच्या पारंपरिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या देशी वृक्षांच्या झपाट्याने घटणाऱ्या संख्येबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करत त्यांच्या संवर्धनासाठी शाश्वत उपाययोजनांची मागणी केली आहे.

कधीकाळी ठाणे शहर हे वड, पिंपळ, उंबर आदी देशी वृक्षांच्या हिरवाईने नटलेले होते. या वृक्षांच्या दाट सावलीमुळे परिसरातील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होत असे. मात्र वाढते शहरीकरण, विकास प्रकल्प आणि काँक्रीटीकरणामुळे हे वृक्ष वेगाने नाहीसे होत असून शहराचा नैसर्गिक समतोल बिघडत आहे.

वड हा केवळ श्रद्धेचा विषय नसून पर्यावरणाचा आधारस्तंभ आहे. हा वृक्ष मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून हवामान बदलाचा प्रभाव कमी करतो, उष्णता कमी करतो, भूजल संवर्धनाला मदत करतो आणि हवेतील प्रदूषक घटक कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी दिली.

एक परिपक्व वटवृक्ष म्हणजे जैवविविधतेचे जिवंत आश्रयस्थान असते. पोपट, कोकीळ, घुबड, सुतार, मैना, खारी, वटवाघळे, मधमाश्या, फुलपाखरे आणि असंख्य कीटकांचे जीवन या वृक्षाभोवती फुलते. त्यामुळे एक जुना वड म्हणजे एका छोट्या जंगलाइतकी समृद्ध परिसंस्था असते.

दुर्दैवाने, अनेक गृहसंकुले आणि सोसायट्यांमध्ये वडाची लागवड टाळली जाते. भविष्यात त्याच्या वाढीमुळे इमारतींना धोका निर्माण होईल, या भीतीमुळे देशी वृक्षांऐवजी विदेशी शोभेच्या झाडांना प्राधान्य दिले जात आहे. परिणामी पक्ष्यांचे अधिवास कमी होत असून शहराची जैवविविधता धोक्यात येत आहे.

वड हा केवळ श्रद्धेचा नाही, तर संपूर्ण जैवविविधतेचा आधार आहे. एक परिपक्व वडवृक्ष शेकडो पक्षी, कीटक आणि असंख्य जीवांना आश्रय देतो. त्यामुळे वडवृक्षांचे संवर्धन म्हणजे केवळ एक झाड वाचवणे नव्हे, तर संपूर्ण पर्यावरण साखळीचे संरक्षण करणे होय.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक)

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती