Thane : पहिली वातानुकूलित डबलडेकर बस अखेर रस्त्यावर; चार्जिंग सुविधेच्या समस्येनंतर पर्यायी व्यवस्था, सर्कल-भाईंदरपाडा मार्गावर धावली  (संग्रहित छायाचित्र)
ठाणे

Thane : पहिली वातानुकूलित डबलडेकर बस अखेर रस्त्यावर; चार्जिंग सुविधेच्या समस्येनंतर पर्यायी व्यवस्था, सर्कल-भाईंदरपाडा मार्गावर धावली

महाराष्ट्र दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेली ठाणे परिवहन सेवेची पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस अखेर ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.

Swapnil S

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेली ठाणे परिवहन सेवेची पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस अखेर ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. चार्जिंग स्टेशनच्या तांत्रिक अडचणीमुळे जवळपास महिनाभर घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगारात निष्क्रिय अवस्थेत उभी असलेली ही बस महापालिकेच्या हस्तक्षेपानंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्याने आता नियमितपणे रस्त्यावर धावू लागली आहे.

कोपरी येथील विद्यमान चार्जिंग स्टेशनवर इतर इलेक्ट्रिक बस चार्ज होत असल्या, तरी डबलडेकर बसची प्रणाली वेगळी असल्याने तेथे चार्जिंग शक्य नव्हते. डबलडेकर बससाठी पर्यायी चार्जिंग सुविधा उपलब्ध करण्याबाबत त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

भविष्यात एकूण दहा बस दाखल होणार

महापौरांच्या निर्देशानंतर परिवहन प्रशासनाने चार्जिंगची पर्यायी व्यवस्था उभी केल्यानंतर अखेर १५ जूनपासून ही बस नियमित सेवेत दाखल झाली. दरम्यान, ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच आणखी एक वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात दोन डबलडेकर बस शहरात धावणार असून, भविष्यात अशा एकूण दहा बस ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय

सध्या बस २२ नंबर सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर धावत असून सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुमजली रचना, वातानुकूलित सुविधा, प्रशस्त आसनव्यवस्था आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानामुळे या बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः घोडबंदर रोड परिसरातील प्रवाशांसाठी ही सेवा आकर्षणाचा विषय ठरत असून अनेक नागरिक डबलडेकर बसमधून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग