Thane : गणेशोत्सवात चार दिवस लाऊडस्पीकरचा दणदणाट! ध्वनिक्षेपक वापरासाठी १५ दिवसांची विशेष सूट; तीन दिवस राखीव प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : गणेशोत्सवात चार दिवस लाऊडस्पीकरचा दणदणाट! ध्वनिक्षेपक वापरासाठी १५ दिवसांची विशेष सूट; तीन दिवस राखीव

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना दिलासा देणारा निर्णय घेत ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांच्या वापरासाठी वर्षातील १५ विशेष दिवस निश्चित केले आहेत.

Swapnil S

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना दिलासा देणारा निर्णय घेत ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकांच्या वापरासाठी वर्षातील १५ विशेष दिवस निश्चित केले आहेत. या दिवसांमध्ये सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी राहणार आहे. मात्र, ध्वनिप्रदूषणाची विहित मर्यादा पाळणे बंधनकारक राहणार आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील तरतुदींनुसार ही विशेष सूट देण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्याच्या महसूल हद्दीत सन २०२६ साठी १५ विशेष दिवस निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी गणेशोत्सवासाठी चार दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

१५ सप्टेंबर, १८ सप्टेंबर, १९ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी या दिवशी विशेष सूट लागू राहणार आहे. गणेश विसर्जनाचे विविध दिवस तसेच गौरी विसर्जनाचा विचार करून गणेशोत्सवासाठी हे चार दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकांचा वापर करता येणार आहे.

विविध सणांसाठीही विशेष दिवस

गणेशोत्सवाव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, ईद-ए-मिलाद, नवरात्रोत्सवातील अष्टमी, दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस तसेच वर्षअखेरचा दिवस यांचाही विशेष दिवसांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ विशेष दिवसांपैकी १२ दिवस निश्चित केले असून, उर्वरित तीन दिवस राखीव ठेवले आहेत. पोलीस विभागाशी सल्लामसलत करून आवश्यकतेनुसार या तीन दिवसांसाठी स्वतंत्र परवानगी देण्यात येणार आहे.

नियमांचे पालन बंधनकारक

ही विशेष सूट श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागू राहणार आहे. विशेष दिवसांची सूट मिळाली असली तरी ध्वनीची विहित मर्यादा ओलांडता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा असली, तरी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता