Thane : हरित फटाकेच विकता येणार; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके फोडण्यावर निर्बंध 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Thane : हरित फटाकेच विकता येणार; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके फोडण्यावर निर्बंध

दिवाळीचा सण साजरा करताना ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Swapnil S

ठाणे: दिवाळीचा सण साजरा करताना ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असल्याने शहरात केवळ हरित फटाक्यांच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच रस्ते, गल्ल्या, पदपथ आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनी आणि पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर आणि १५ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने हे निर्देश लागू करण्यात आले आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरासह सर्व शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडण्यास मनाई आहे. ध्वनिप्रदूषण नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत आवाज करणारे फटाके फोडता येणार नाहीत. खासगी जागेतही ध्वनीच्या निर्धारित मर्यादांचे पालन करणे बंधनकारक आहे.

मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. नियमभंग आढळल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

विक्रीसाठी पालिकेची परवानगी आवश्यक

फटाके विक्रेत्यांना प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करता येणार नाही. परवानगी असलेल्या फटाक्यांची विक्रीदेखील महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी आणि आवश्यक परवानगी घेऊनच करावी लागणार आहे. १२५ डेसिबल (एआय) पेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री आणि वापर करण्यास मनाई असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार