Thane : फॉर्म ७ द्वारे मतदारांची नावे कापण्याचा डाव? आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; मुंब्य्रात २८० जणांचे अर्ज दाखल संग्रहित छायाचित्र
ठाणे

Thane : फॉर्म ७ द्वारे मतदारांची नावे कापण्याचा डाव? आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; मुंब्य्रात २८० जणांचे अर्ज दाखल

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत फॉर्म क्रमांक ७ चा गैरवापर करून मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Swapnil S

ठाणे : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेत फॉर्म क्रमांक ७ चा गैरवापर करून मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंब्यात २८० मतदारांच्या नावाने फॉर्म क्रमांक ७दाखल झाल्याचे आढळले असून, त्यापैकी संपर्क साधलेल्या २७० मतदारांनी आपण असे अर्ज भरलेच नसल्याचे सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केला. कळवा आणि ठाण्यातही अशाच प्रकारचे प्रकार घडत असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

ठाण्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म क्रमांक ७ च्या माध्यमातून पात्र मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. विशेषतः गरीब, दलित, मुस्लिम आणि वंचित घटकांतील मतदारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाने अर्ज दाखल होत असतील, तर ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचे आव्हाड यांनी नमूद केले.

मुंब्यातील अर्जाबाबत संशय

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर मुंब्यातील संबंधित मतदारांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी २७० मतदारांनी आपण फॉर्म क्रमांक ७ भरला नसल्याचे सांगितल्याचा दावा आव्हाड यांनी केला. एका महिला मतदाराच्या नावाने अर्ज दाखल झाला होता; मात्र हा अर्ज कोणी भरला, याची संबंधित महिलेलाच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. काही अर्जावर नागपूरमधील पिनकोड नमूद असल्याचे, तर काही अर्जामध्ये पत्त्यांची माहिती अपुरी असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. कळवा परिसरातील काही कार्यकर्त्यांच्या नावानेही असे अर्ज दाखल झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला.

दोषींवर कारवाईची मागणी

फॉर्म क्रमांक ७ च्या माध्यमातून दाखल होणाऱ्या प्रत्येक अर्जाची सत्यता तपासावी, मतदारांच्या संमतीशिवाय अर्ज दाखल झाल्याचे आढळल्यास संबंधितांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. मतदार यादीतील नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखून पात्र मतदारांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई