ठाणे : ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर रविवारी (३० ऑगस्ट) ठाणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. धावपटूंची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने विविध मार्गांवर प्रवेशबंदी, वाहतूक वळविणे तसेच 'नो पार्किंग'ची व्यवस्था केली आहे. हे वाहतूक बदल शनिवार (२९ ऑगस्ट) रात्री ९ वाजल्यापासून रविवार (३० ऑग३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर रविवारी (३० ऑगस्ट) ठाणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. धावपटूंची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने विविध मार्गांवर प्रवेशबंदी, वाहतूक वळविणे तसेच 'नो पार्किंग'ची व्यवस्था केली आहे.३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर रविवारी (३० ऑगस्ट) ठाणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. धावपटूंची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने विविध मार्गांवर प्रवेशबंदी, वाहतूक वळविणे तसेच 'नो पार्किंग'ची व्यवस्था केली आहे.स्ट) सायंकाळी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
नितीन कंपनीकडून टीएमसी सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांना नितीन जंक्शन येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी कॅडबरी जंक्शन, खोपट तसेच तीन हात नाका-हरीनिवास सर्कलमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ठाणे वैभव चौक-अल्मेडा सिग्नलकडून टीएमसी सर्कलकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी असून, वदना टी-पॉइंट, डेपो आणि खोपटमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गाच्या स्लिप रोडचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर मार्ग, कौशल्या हॉस्पिटल-कौशल्या कट, सतरंज वेफर्स-टीएमसी सर्कल आणि नुरी बाबा दर्गा-टीएमसी सर्कल या मार्गावरील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. ज्ञानेश्वरनगर, आंबेवाडी, कामगारनाका, यशोधननगर, लोकमान्यनगर आणि आईमाता चौक परिसरातील वाहतुकीवरही निर्बंध राहणार आहेत. याशिवाय गोल्डन नाका-हनुमान मंदिर, बिरसा मुंडा चौक-गांधीनगर आणि बिरसा मुंडा चौक-पवारनगर या मार्गांवरील वाहतूकही वळविण्यात आली आहे. काही मार्गावर वाहतुकीची एक बाजू तात्पुरती दुहेरी करण्यात येणार आहे.
प्रमुख ठिकाणी 'नो पार्किंग'
मॅरेथॉनच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कॅडबरी जंक्शन, नितीन जंक्शन, तीन हात नाका, घड्याळ नाका, सतरंज वेफर्स, अल्मेडा सिग्नल, येवले चहा, दगडी शाळा, मालतीबाई हॉस्पिटल, मॉडेला चेकनाका, रोड क्रमांक १६ व २२, साठेनगर चौक, इंदिरानगर नाका, कामगारनगर नाका, आर. जे. ठाकूर कॉलेज, यशोधननगर आणि आईमाता चौक परिसरात 'नो पार्किंग' लागू करण्यात आले आहे.
मॅरेथॉन स्पर्धा सुरळीत पार पडावी तसेच धावपटूंच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक निर्बंधांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा.पंकज शिरसाठ, उपायुक्त वाहतूक