ठाणे : महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. ठाणे महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने सत्ताधारी युतीतून कोणाची या पदावर वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. शिंदेसेनेतील काही संभाव्य नावे पुढे आली असून, भाजपकडूनही संधी मिळाल्यास त्यांच्या दोन नगरसेवकांची नावेही चर्चेत आहेत.
शिंदेसेनेकडून कोणती नावे चर्चेत?
शिंदेसेनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील सात नगरसेवक विजयी झाले आहेत.
१) पद्मा भगत (प्रभाग ३ अ),
२) वनिता घोगरे (प्रभाग ६ अ)
३) विमल भोईर (प्रभाग ७ अ)
४) गणेश कांबळे (प्रभाग ९ अ)
५) डॉ. दर्शना जानकर (प्रभाग १६ अ)
६) आरती गायकवाड (प्रभाग २४ अ)
७) दीपक जाधव (प्रभाग २८ अ)
भाजपकडून दोन नावे
भाजपच्या वाट्याला महापौरपद आले, तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे दोन नगरसेवक सध्या चर्चेत आहेत.
१) सुरेश कांबळे, प्रभाग क्रमांक १५ (अ)
२) उषा वाघ, प्रभाग क्रमांक २२ (अ)
ठाणे महापालिका निवडणुकीत युतीत लढणाऱ्या शिंदेसेनेला ७५ जागा, तर भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. शिंदेसेनेने ७५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून महापौरपद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे.