Photo : X (Eknath Shinde)
ठाणे

ठाणे महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या शर्मिला पिंपळोलकरांचा अर्ज; भाजपची भूमिका झाली मवाळ

ठाण्यात महापौरपद कोणाला मिळणार, याबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात आली असून ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर दोन वर्षांसाठी महापौरपद मिळावे अन्यथाविरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने अखेर आपली भूमिका बदलतसत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

Swapnil S

ठाणे : ठाण्यात महापौरपद कोणाला मिळणार, याबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात आली असून ठाणे महापालिकेच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर दोन वर्षांसाठी महापौरपद मिळावे अन्यथाविरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आज अखेर आपली भूमिका बदलतसत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजप कडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. युतीच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

शिंदेच्या सेनेला मिळालेय पूर्ण बहुमत

नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या सेनेलापूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यांचे ७५ नगरसेवक निवडून आले असून भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे सेनेचाच महापौर होणार हे निश्चित झाले होते. महापौर पदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने महापौर पदासाठी डॉ. दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत आणि शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शुक्रवारी महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनी आपले नामनिर्देशन दाखल केले. यामध्ये शर्मिला पिंपळोलकर यांचे नाव निश्चित करण्यात आले तर उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे.

शर्मिला पिंपळोलकर, शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदे सेनेचे ७५ नगरसेवक आणि भाजप पक्षाचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील शिंदे सेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदे सेनेचे ७६ नगरसेवक झाले आहेत. शर्मिला पिंपळोलकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी परिसरातून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

भाजपची विरोधाची भूमिका झाली मवाळ

दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या आणि ते मिळाले नाही तर वेळप्रसंगी विरोधी बाकावर बसण्याची तयारी करणाऱ्या भाजपने अखेर सत्तेत राहणे पसंत केले आहे. त्यानुसार भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. कृष्णा पाटील प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

आम्ही युतीत लढलो होतो, त्यानुसार आता सत्तेतही आम्ही एकत्र आहोत. इतर पदांबाबत महापौर प्रत्यक्ष खुर्चीवर विराजमान झाल्यावरच कोणाला काय द्यायचे यावर चर्चा होणार आहे. परंतु जे काही होईल ते निश्चित चांगलेच होणार आहे.
- नरेश म्हस्के, खासदार, ठाणे
एका सर्वसामान्य स्त्रीला न्याय दिला आहे. त्यामुळे मला जे पद मिळालेले आहे, त्या पदाला न्याय देण्याचे काम निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच दिलेल्या संधीचे सोने केले जाईल.
- शर्मिला पिंपळोलकर

सुनेत्रा पवार आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; ठरणार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई महापौरपदाचा पेच सुटला; 'या' नावांची चर्चा; महापौर, स्थायी समितीसह अन्य समित्यांबाबतही ठरले

मुंबई महापालिकेत 'नवा भिडू, नवे राज्य'

कार्यकर्त्यांचा आधार, विकासाची दिशा

आजचे राशिभविष्य, ३१ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत