Thane : पालिकेत स्मार्ट चष्म्यांना बंदी; स्मार्ट चष्म्याने चित्रित 'रिल्स'नंतर महापालिकेची कारवाई 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
ठाणे

Thane : पालिकेत स्मार्ट चष्म्यांना बंदी; स्मार्ट चष्म्याने चित्रित 'रिल्स'नंतर महापालिकेची कारवाई

ठाणे महापालिकेच्या महासभेचे कामकाज मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या स्मार्ट चष्म्यातून चित्रित करून त्याच्या 'रिल्स' सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारावर अखेर महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेचे कामकाज मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या स्मार्ट चष्म्यातून चित्रित करून त्याच्या 'रिल्स' सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारावर अखेर महापालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यापुढे प्रेक्षक गॅलरीत येणाऱ्या नागरिकांना मोबाईल तसेच कॅमेरा असलेले चष्मे घेऊन प्रवेश करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, या निर्णयाची अंमलबजावणी त्याच महासभेत तात्काळ करण्यात आली.

ठाणे महापालिकेच्या महासभेचे कामकाज पाहण्यासाठी सभागृहाच्या वरच्या भागात प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था आहे. नागरिक या ठिकाणी बसून महासभेतील चर्चा, विकासकामांवरील निर्णय, प्रशासनाला विचारले जाणारे प्रश्न आणि नगरसेवकांची भूमिका प्रत्यक्ष पाहू शकतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून काही नागरिक मोबाईल तसेच कॅमेऱ्याने सुसज्ज स्मार्ट चष्म्यांच्या माध्यमातून सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करू लागले होते. या व्हिडिओंच्या रील्स तयार करून त्या विविध समाजमाध्यमांवर व्हायरल केल्या जात असल्याने सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचे संदेश जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.

चोरून चित्रीकरण अयोग्य

महासभेत हा मुद्दा उपस्थित करत नगरसेवकांनी अशा प्रकाराला तातडीने आळा घालण्याची मागणी केली. काही नगरसेवकांच्या समर्थकांकडूनही अशा प्रकारचे चित्रीकरण होत असल्याचे निदर्शनाला आणून देण्यात आले. महासभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याला परवानगी नसताना अशा पद्धतीने चोरून चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे अयोग्य असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी