ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार 
ठाणे

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजारांचे सानुग्रह अनुदान; आशा सेविकांना सहा हजार रुपये, दिवाळीपूर्वी रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली आहे.

Swapnil S

ठाणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली आहे.

महापालिकेतील कायमस्वरूपी, एकत्रित वेतनावरील आणि कंत्राटी मानधनावरील अशा एकूण ६ हजार ६६२ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. परिवहन सेवेतील १ हजार २८५ कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये, तर ६७३ आशा सेविकांना प्रत्येकी सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेवर सुमारे २०.११ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर,सर्वपक्षीय गटनेते आणि महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सानुग्रह अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. महापालिकेचे कर्मचारी वर्षभर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्ते आणि अन्य नागरी सुविधा पुरविण्यासाठी अहोरात्र काम करतात. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक हातभार मिळणार आहे.

पाच वर्षांत साडेनऊ हजार रुपयांची वाढ

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ करण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये अनुदान दिले जात होते. २०२४-२५ मध्ये ही रक्कम २४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली. यंदा त्यात आणखी ५०० रुपयांची वाढ करून २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अधिक गोड होणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन

मुंबईकरांना मिळणार ४०० नवे लोखंडी कचरा डबे; एका डब्यासाठी पंधराशे रुपये अधिक मोजणार

IIT Bombay Student Suicide Case : आत्महत्येची सीबीआय चौकशी करा! साहिल वाकोडेच्या पालकांची न्यायालयात याचिका

Mumbai : १४ ट्रॅक्शन सबस्टेशन्सची उभारणी अंतिम टप्प्यात; बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पाच, तर गुजरातमध्ये ९ सबस्टेशन्स

Satara: अवघा १८० मिमी पाऊस; तरीही जलसमृद्धीचे आदर्श मॉडेल; दहा वर्षांनंतरही कामांचे सकारात्मक परिणाम