ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती 
ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती

ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खातेच सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर अचानक अश्लील चित्रफिती प्रसारित होऊ लागल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खातेच सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर अचानक अश्लील चित्रफिती प्रसारित होऊ लागल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांत टप्प्याटप्प्याने सुमारे २० आक्षेपार्ह चित्रफिती अपलोड करण्यात आल्या. हा प्रकार लक्षात येताच पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व चित्रफिती हटविण्यात यश आले.

मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर पहिली अश्लील चित्रफीत दिसून आली. त्यानंतर काही वेळातच एकापाठोपाठ अन्य चित्रफिती अपलोड होऊ लागल्या. काही मिनिटांतच त्यांची संख्या सुमारे २० वर पोहोचली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तातडीने आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित पोलीस यंत्रणांना सतर्क करण्यात आले. आयुक्तांच्या व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत ताबा घेतला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. दरम्यान, स्टेट्सवर आक्षेपार्ह चित्रफिती अपलोड होण्याचे सत्र सुरू असल्याने त्या तातडीने हटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व चित्रफिती हटविण्यात आल्या.

सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे व्हॉट्सॲप खातेच अशा प्रकारे निशाण्यावर आल्याने पोलीस दलाच्या सायबर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. खाते नेमके कशा पद्धतीने हॅक करण्यात आले, या प्रकारामागे कोणाचा हात आहे आणि यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा सायबर यंत्रणेकडून शोध घेतला जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दुष्काळाचे संकट गडद; आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित, राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार

स्मृतिदालनाचे लोकार्पण, नव्या वादाची चिन्हे; बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण - उद्धव ठाकरे

आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर; अजित पवार अपघातप्रकरणी चाैकशीची मागणी

३ हजार ४२ धरणांमध्ये ६४ टक्केच पाणी; राज्यातील स्थिती चिंताजनक; गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट

चीनला शह देण्याचे आखाडे; बळाच्या वापराने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकतर्फी कृतींना ‘क्वाड’ परिषदेत विरोध