प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

दिवाळीत ठाण्यातील प्रदूषणात वाढ; ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून अभ्यास

यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

Swapnil S

ठाणे: नागरिकांनी यंदाही दिवाळी सण उत्साहाने साजरा केला. या काळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र, संध्याकाळच्यावेळी झालेल्या पावसामुळे तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला. अर्थात, यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर, दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

२०२४च्या दिवाळी कालावधीतील हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत ७.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील ३ वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचे मूल्यमापन केले असता असे निदर्शनास येते की, २०२३ मध्ये दिवाळी कालावधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मध्ये ६२.६ टक्के वाढ झाली. सन २०२४मध्ये दिवाळी कालावधीत निर्देशांकात ३३.९ टक्के वाढ झाली होती.

हवा गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ठाणे शहरात दिवाळी २०२५ कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनिअर केमिस्ट ओम सत्याशिव परळकर यांनी हा अभ्यास केला. या अभ्यासात, दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यानुसार दि. ११ ऑक्टोबर रोजी दिपावली पूर्व कालावधीत हवेतील धुलिकणांचे प्रमाण १४३ ug / m ३ हवेतील NOx चे प्रमाण ३१ ug /m ३ तर SO2 चे प्रमाण १३ ug / m३ आढळले असून त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक १४१ होता.

तर, दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलिकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच १३९ ug /m3 इतके आढळून आले. तसेच, या दिवशी हवेतील NOx चे प्रमाण ३० ug /m 3 तर SO2 चे प्रमाण १७ ug / m 3 इतके आढळले असून त्यानुसार हवा गुणवत्ता निर्देशांक १५७ होता. दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत ३.२ टक्के वाढ नोंदली गेली आहे.

हरित फटाकेच हवेत - मनीषा प्रधान

यंदा पावसामुळे प्रदूषणाच्या सरासरीत दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत असले तरी पाऊस थांबल्यानंतर धुलिकणात अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही धोकादायक स्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी केवळ हरित फटाक्यांकडे आपला कल नेणे ही काळाची गरज आहे. पावसामुळे ठाण्यातील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवरच राहिला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणामध्ये सरासरी ११.१ टक्के वाढ नोंदली गेली, असे ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले.

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Mumbai : 'अमेरिकेत जाऊन आंदोलन करा'; इम्रान खानला हायकोर्टाने फटकारलं, भारत सोडण्याच्या नोटिशीवर मात्र स्थगिती

पोलीस ठाण्यातच महिलेवर बलात्काराचा आरोप; ३ पोलीस कर्मचारी अटकेत, १५ जण निलंबित; नेमकं काय घडलं?

Mumbai : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून विषबाधा; नवरा-नवरीसह २७ जण आजारी, तुकाराम मुंढेंनी चौकशी करण्याची मागणी

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर