प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

ठाण्यात पोस्टर्सवर कारवाई; आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा दणका

राज्यातील महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी सायंकाळपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होताच, ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील चौकाचौकात, खासगी जागेवर, शासकीय जागांवर लावण्यात येणाऱ्या राजकीय बॅनर, पोस्टर आणि झेंडे हटविण्याची कारवाई सुरू केली.

Swapnil S

ठाणे : राज्यातील महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारी सायंकाळपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होताच, ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील चौकाचौकात, खासगी जागेवर, शासकीय जागांवर लावण्यात येणाऱ्या राजकीय बॅनर, पोस्टर आणि झेंडे हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यानुसार मागील २४ तासांत ठाणे पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती अंतर्गत ९४२ बॅनर, पोस्टरवर कारवाई करीत हटविण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे शहरातील बॅनर, पोस्टरने गुदमरलेल्या चौकांनी, नाक्यांनी मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशातच विविध चौकाचौकात राजकीय पुढाऱ्यांसह आजी माजी लोकप्रतिनिधींनी, राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात येतात. पक्षात मोठे पद मिळालेल्या नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात येतात. ते लावल्यानंतर ते काढण्याची तसदी त्यांच्याकडून घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. यामुळे बरेच दिवस हे फलक त्याच जागेवर दिसून येतात. या फलकांमुळे शहरातील चौक व नाके विद्रुपीकरण होते. अशा बेकायदा फलकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फारशी कारवाई होत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यात ठाणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा, भाई, इच्छुकांनी भावी नगरसेवक, फिक्स नगरसेवक अशा आशयाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शहरात राजकीय बॅनरबाजीचे प्रमाण वाढले होते.

शहरातील नाक्यानाक्यांवर आणि चौकाचौकात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फलक झळकताना दिसून येत होते, तर कुठे केलेल्या कामाचे श्रेय घेणारे फलक देखील लावण्यात आले होते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र होते.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे, पोस्टरवर कारवाईची बडगा उगारला.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

एसटीच्या 'शिवनेरी' धावणार राज्यभरात; २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेसची खरेदी

मिठी नदी गाळ घोटाळा : EOW कडून दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट मंजूर होत नाही; नाशिकच्या कौटुंबिक कोर्टाचा आदेश रद्दबातल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार