Thane : पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय 
ठाणे

Thane : पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे.

Swapnil S

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुभाष शिंदे उर्फ पप्या शिंदे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हत्येसाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुले आणि तीन चॉपर कोणी उपलब्ध करून दिले, तसेच फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याला दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर मोबाईल आणि सिमकार्ड खरेदी करून कोणी दिले, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. शस्त्रांची व्यवस्था पप्या शिंदे याने केल्याचा पोलिसांचा संशय आहे. शुक्रवारी कोठडीची मुदत संपल्याने पप्या शिंदे याला न्यायाधीश एस. बी. साबळे यांच्यासमोर हजर करण्यात आले.

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी बचाव करताना पुरवणी जबाबात उल्लेख असलेल्या अन्य दोन व्यक्तींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तपासातील कथित विसंगतींकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर खरेदी केलेला मोबाईल टल्लीला दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कुठून आणली आणि गुन्ह्यानंतर ती कुठे लपवली, याचा तपास अद्याप बाकी आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला