Thane : ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

Thane : ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या

ठाणे शहरातील कासारवडवली परिसरातील २३ मजली इमारतीच्या डक्टमध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Swapnil S

ठाणे : ठाणे शहरातील कासारवडवली परिसरातील २३ मजली इमारतीच्या डक्टमध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली येथील तरंगण सोसायटीतील १४व्या मजल्यावर राहणारे विद्यासागर एम. व्ही. (७२) यांनी इमारतीच्या १२व्या मजल्यावरील डक्ट परिसरात लाकडी बांधकामाच्या आधाराला बेडशीट बांधून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कासारवडवली पोलीस, ठाणे महापालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष (आरडीएमसी) आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्कायलिफ्ट, अग्निशमन बंब आणि इतर बचाव साहित्याच्या सहाय्याने सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आकस्मिक मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम