ठाणे

जव्हारमध्ये बाप्पाच्या आगमनाची चाहूल;मंडळांच्या तयारीने धरला जोर

वृत्तसंस्था

मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण, उत्सवांवर निर्बंध होते. यावर्षी राज्य सरकारने निर्बंध उठविले असून, धूमधडाक्यात सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले असल्याने बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागल्याने मूर्तिकार लगबगीने व्यस्त झाले आहेत, तर जव्हार शहर आणि तालुक्यातील गणेश मंडळांच्या तयारीने जोर धरला आहे. भाविक देखील बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

शहरातील अनेक कारागिरांकडे मूर्तीचे रंगकाम सुरू आहे. डायमंड चमकी, सिल्व्हर, ऑईल रंगाने मूर्ती सजविण्यात कारागीर व्यस्त आहेत. शिवाय, गणेश मंडळांनी मूर्ती बुकिंग सुरु केले आहे. गणेश मंडळे गणेशोत्सवाच्या दिवशीच मूर्ती नेत असून, अशा मूर्तीचे काम कारागिरांकडून पूर्ण करणे सुरू आहे. घरगुती गणेशाची स्थापना करण्यासाठी नागरिक लहान मूर्तीलाच पसंती देतात. त्यानुसार लहान मूर्ती तयार केली जात आहे. सार्वजनिक कार्यकर्त्यांचीही लगबग वाढली आहे, मंडप उभारणी, वर्गणी काढणे सुरू असताना कार्यकर्ते विविध देखावे तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. मागील काही दिवस सतत पाऊस असल्याने या कामात व्यत्यय आला होता. तालुक्यात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला.

प्रवाशांना ‘बेस्ट’ दरवाढीचा झटका? साध्या बसचे किमान तिकीट ७ रुपये; AC बसचे १० रुपये होणार

घर खरेदीदारांना महारेराचा दिलासा; सोयीसुविधांचा डेटा देणे विकासकांना बंधनकारक

वाढत्या प्रदूषणामुळे मधुमेहाचा धोका! ‘लॅन्सेट’च्या संशोधनात धक्कादायक बाब उघड

भटकती आत्मा! पंतप्रधान मोदी यांची शरद पवारांवर टीका; जयंत पाटील-रोहित पवारांनी दिले प्रत्युत्तर

पुढील महिन्यात मोठी घटना घडण्याची शक्यता; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा