ठाणे

बिबट्याचा थांगपत्ता लागत नसल्याने वन कर्मचारी झाले बेचैन

Swapnil S

मुरूड : शहरात बागायत क्षेत्र खूप मोठे आहे. लोकांच्या घराच्या मागे नारळ सुपारीच्या मोठ्या बागा आहेत. त्यामुळे कुत्र्यांची शिकार करण्याच्या नादात बिबट्या मुरूड शहर हद्दीत घुसला असून, तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परंतु काही केल्या हा बिबट्या सापडत नसल्याने किंवा त्याचा थांग पत्ता लागत नसल्याने वन विभागाचे कर्मचारी मात्र बेचैन झाले आहेत.

मुरूड शहरातील बाजारपेठ अंजुमन हायस्कूलच्या समोर येथील रस्त्यावर जाहीद फकजी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा मुक्त संचार करताना चित्र आढळून आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका पाटील यांना मिळताच तातडीने त्यांचे सहकारी वनपाल व वनरक्षक याठिकाणी येऊन परिसराची पाहणी केली. दुकानाच्या काही अंतरावर बिबट्यासारखे पाऊलखुणा त्या परिसरात दिसून आल्याने शोधमोहीम तीव्र करून रात्रीच्या वेळी वनपाल व वनरक्षक असे १२ जणांची टीम गस्त घालताना दिसत आहे. तसेच नागरिकांना वनविभागाकडून खबरदारीचे पत्रक वाटप करून नाक्यानाक्यावर पत्रके चिटकवली जात आहेत. तसेच शीघ्रे व अन्य गावात खबरदारी म्हणून लाऊडस्पीकरवर लोकांना सूचना देण्यात आली असून, लोकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याला शोधण्यासाठी आम्ही शीघ्र गतीने तत्पर झालो आहोत. तरी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या पकडण्यासाठी रोहा डिव्हीजनकडून रेस्क्यू व्हॅन मागवली आहे. त्याबरोबर आमच्या वनविभागाची गाडी अधूनमधून रोज रात्री ते पहाटेपर्यंत गस्त घालत आहेत. यामध्ये महिला वनरक्षक ही काम करत आहेत. तरी नागरिकांनी खबरदारीचे उपाय म्हणून सूर्यास्तानंतर शक्यतो घराबाहेर पडू नये, गरजेचे असल्यास काठी व बॅटरी घेऊन बाहेर पडावे. रात्री कुत्रे जोरजोराने भूकंत असल्यास जवळपास बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा घरातच सुरक्षित राहावे. शेळ्या, कोंबड्या व गाय-म्हैस, पाळीव प्राण्यांना बंद गोठ्यात ठेवावे.

- प्रियांका पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?