ठाणे

संसदेत राष्ट्रगीत, वंदे मातरम‌् म्हटले जाणे आनंददायी; पद्मभूषण राम नाईक यांचे भावोद्गार

रेल्वे ट्रेनमध्ये मच्छीमार व भाजी विक्रेत्यांना माल नेण्यासाठी राखीव डब्याची सोय केली म्हणून येथील भगिनी मला आपला भाऊ मानतात.

Swapnil S

वसई : संसदेच्या दोन्ही सभागृहांत जनगणमन आणि वंदे मातरम‌् म्हणण्याची परंपरा सुरू होणे, तसेच देशभरातील खासदारांना आपआपल्या मतदारसंघात सार्वजनिक कामासाठी स्वतंत्र खासदार फंड देण्यास सुरुवात माझ्या मागणीवर झाली, या माझ्या संसदीय कारकीर्दीतील परमोच्च आनंद देणाऱ्या घटना असल्याचे भावोद्गार माजी केंद्रीय मंत्री, तथा उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी वसईत काढले. नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वसई-माणिकपूर येथील वाय.एम.सी.ए. सभागृहात सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय मान्यवरांतर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मी ६० वर्षांपासून राजकीय, सामाजिक कार्य निष्कलंकितपणे करीत आहे. अर्नाळा किल्यांत वीज नेल्याच्या घटनेला २२ वर्षे झाली, दरवर्षी न चुकता तेथील नागरिक माझी आठवण म्हणून प्रकाशदिन साजरा करतात.

रेल्वे ट्रेनमध्ये मच्छीमार व भाजी विक्रेत्यांना माल नेण्यासाठी राखीव डब्याची सोय केली म्हणून येथील भगिनी मला आपला भाऊ मानतात. डहाणू, पालघर, वसई विभागांतील नागरिकांसाठी डहाणू ते चर्चगेट शटल सुरू केल्यानंतर त्या ट्रेनला "राम नाईक शटल" असे म्हणण्यास जनतेने स्वतःहून सुरूवात केली. मी कॅन्सरने आजारी असताना ख्रिस्ती बांधवांनी माझ्यासाठी चर्चमधून प्रार्थना केली.

येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ खास टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी, वसईतील बिशप हाऊसमधेच घेण्याचा अधिक संयुक्तिक सल्ला दिला होता, ही आठवण सुद्धा नाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!