ठाणे

उल्हासनगर : बांगलादेशी महिलेला अटक

खडेगोळवली येथील गंगाविहार कॉलनीतून बुधवारी दुपारी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका २७ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : खडेगोळवली येथील गंगाविहार कॉलनीतून बुधवारी दुपारी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका २७ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला गेल्या सहा महिन्यांपासून कल्याणमध्ये राहत होती, तर त्याआधी ती मुंबईतील विविध भागांत वास्तव्य करत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. 'महिला गंगाविहार कॉलनीत लपून राहत असल्याचे आम्हाला समजले होते. त्यानंतर या ठिकाणी सापळा रचून तिला ताब्यात घेण्यात आले,' असे कोळी यांनी सांगितले. गेल्या महिनाभरात उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातून आतापर्यंत सात बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर परदेशी नागरिक कायदा व इतर संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

नवी मुंबई विमानतळावरून ३० लाख प्रवाशांचा प्रवास; ४६ शहरांशी हवाई जोडणीचा विस्तार

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Palghar : रेशनकार्ड काढून देण्यासाठी लाचेची मागणी; तहसील कर्मचाऱ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या