प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

क्रिकेट सट्टेबाजप्रकरणी उल्हासनगरात चौघे गजाआड

क्रीडा जगतातील थरार आता गुन्हेगारीच्या मैदानावर पोहचल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ परिसरात पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : क्रीडा जगतातील थरार आता गुन्हेगारीच्या मैदानावर पोहचल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ परिसरात पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईत मिनेश सतिशचंद्र जोशी, विजय नारायणदास मध्यानी, राजा आणि पंकज या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही धडक कारवाई २९ ऑक्टोबर रोजी रामचंद्र भाटीजा नगर, हिरा घाट रोडवरील बॅरेक क्रमांक ८२५, सेक्शन १७ येथे करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना Allpanelexch या ऑनलाइन ॲपद्वारे सुरू असलेल्या क्रिकेट बेटिंगचे ठोस पुरावे मिळाले. आरोपी या अॅपच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करत होते, तसेच इतरांनाही सहभागी करून घेत होते.

सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या रॅकेटमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

BMC Election: ठाकरे सेना, मनसेचे मराठी भागांवर लक्ष; जिंकणाऱ्या जागांवर तडजोडीची भूमिका

मतविभाजनासाठी भाजप बंडखोरांची टीम? शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसेला बसणार फटका

अमेरिकेच्या भारत-चीन अहवालावर चीनचा तीव्र आक्षेप

चहा कशाला म्हणायचे? नवीन व्याख्या जाहीर; ‘हर्बल, फ्लॉवर टी’ला चहा म्हणणे बेकायदेशीर

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सदनिकांचे वाटप ऑनलाइनच; स्वीकार-नकारासाठी ५ दिवसांचा अवधी, शासन निर्णय जारी