ठाणे

Ulhasnagar : नालेसफाईच्या कामात बालकांच्या जीवाशी खेळ; कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात बालकामगारांचा वापर करून त्यांच्या जीवाशी खेळ खेळल्याचा धक्कादायक प्रकार राजीव गांधी नगर परिसरात उघडकीस आला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात बालकामगारांचा वापर करून त्यांच्या जीवाशी खेळ खेळल्याचा धक्कादायक प्रकार राजीव गांधी नगर परिसरात उघडकीस आला आहे.

येथील मोठ्या नाल्यात अल्पवयीन मुलांना उतरवून गाळ काढण्याचे काम करून घेतले जात असल्याचे समोर आले असून, पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसवून गोलाकार फिरवल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेले नालेसफाईचे काम शुभम कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. पोकलेन मशीनच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कामादरम्यान अल्पवयीन मुलांना थेट नाल्यात उतरवून कचरा पोकलेनच्या बकेटमध्ये भरण्याचे काम करून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी युवासेनेचे कल्याण जिल्हा सचिव हरजिंदरसिंह भुल्लर यांनी महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, पोकलेन चालक तसेच महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हरजिंदरसिंह भुल्लर यांनी केली आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग